पांगरी फटाके फॅक्टरी प्रकरणात मोठा खुलासा, कारखान्याला कोणताही परवाना नव्हता; मालका विरोधात गुन्हा दाखल, मालक साथीदारासह फरार

कारखाना मालक युसुफ मणियार आणि साथीदार नाना पाटेकर दोघेही अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे कारखाना चालवण्यासाठी कोणताही परवाना नव्हता, ही बाब देखील फिर्यादमध्ये नमूद केल्या आहेत. सहाय्यक पोलीस फौजदार सतीश कोठावळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    सोलावूर – बार्शीतील पांगरी-शिराळा फटका फॅक्टरी स्फोट प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखाना मालकांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मालक युसुफ मणियार आणि नाना पाटेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बार्शीतल्या पांगरी पोलीस ठाण्यात भादवि कलम 304, 337, 338, 285, 286, 34, भारतीय विस्फोटक अधिनियम 1884 चे कलम पाच आणि नऊ ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    कारखाना मालक युसुफ मणियार आणि साथीदार नाना पाटेकर दोघेही अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे कारखाना चालवण्यासाठी कोणताही परवाना नव्हता, ही बाब देखील फिर्यादमध्ये नमूद केल्या आहेत. सहाय्यक पोलीस फौजदार सतीश कोठावळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना फॅक्ट्रीमध्ये स्फोट झाला तिथल्या मजुरांच्या सुरक्षेची कुठलीही साधनं तिथं नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय तिथले कामगार जे काम करत होते त्यांना त्या कामाबद्दल कुठलंही प्रशिक्षण देखील दिलं नव्हतं.

    सोलापूर- पांगरी फटाका आग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूर- फटाका कारखान्यात ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या कारखान्याला कोणताही परवाना नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय परवानगी दिलेली जागा सोडून दुसरीकडे कारखाना सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.

    मृतांची संख्या पाचवर
    तालुक्यातील पांगरी जवळील शिराळा येथील शोभेच्या दारूच्या कारखान्यात स्फोट होऊन काल तीन जण मृत्यूमुखी पडले होते. ती संख्या आज पाचवर येऊन पोचली. तर अन्य नऊ जखमींवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास स्फोटामुळे लागलेल्या आगीत होरपळून सुमन जाधवर, (वालवड), गंगुबाई सांगळे (उकडगाव), मीना मगर (पांगरी) या महिलांसह इतर दोन जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना इतकी भयानक होती की, मृतदेह जळून खाक झाले होते. ही घटना अत्यंत हृदयद्रावक होती.

    काल दुपारच्या सुमारासम सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये (Solapur Barshi Pangri Fire News) फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत चार महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत शासनाकडून घोषित करण्यात आली आहे.