करुणा शर्माच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? : जाणून घ्या सविस्तर

करुणा शर्मा हिच्यासह आणखी एका व्यक्तीवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैसर्गिक अत्याचार, कौटुंबीक छळ अशा विविध कलमान्वये करुणा शर्मा आणि एक जणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    पुणे : करुणा शर्मा हिच्यासह एका व्यक्तीवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैसर्गिक अत्याचार, कौटुंबीक छळ अशा विविध कलमान्वये करुणा शर्मा आणि एका व्यक्तीवर पुण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.

    या प्रकरणी येरवडातील महिलेने फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे, की तिचा पती व करुणा शर्मा हिच्यावर शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करुन पतीसोबत घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

    नेमकं काय आहे प्रकरण? 

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिचा पती हे उस्मानाबादला राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्माबरोबर झाली. ती आपली ओळख करुणा मुंडे असे करुन देत. फिर्यादीचा पती वारंवार करुणा शर्माच्या घरी राहू लागला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा पती पुण्यात येऊन स्थायिक झाले. पती हा शर्माची वारंवार बोलत होता. १६ फेब्रूवारी २०२२ रोजी कार्यक्रमाला जायचे म्हणून पतीने फिर्यादीला भोसरी येथे नेले.

    येथे करुणा शर्मा हिने हाॅकीस्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव हे करित आहेत.