साधू मारहाण प्रकरण चिघळलं; 25 जणांवर गुन्हा दाखल, सात जणांना अटक

उत्तर प्रदेशचे चार साधू कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. या दरम्यान त्यांनी मार्गाबद्दल स्थानिकांना विचारणा केली. त्याची भाषा ही न कळल्याने लोकांना त्यांच्यावर संशय आला. मुलं चोरणारी टोळी समजून चौघांनाही गाडीतून ओढून काठीनं, पट्ट्यानं मारहाण करण्यात आली.

    सांगली : कर्नाटकातील साधूंना सांगलीमध्ये (Sangali Sadhu) साधू मारहाण प्रकरणी करण्यात आली होती. या प्रकरणी लवंगा गावातील एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. तर, सरपंच पुत्र आणि माजी सरपंचालाही एकूण सात जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे.

    मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून साधूंना मारहाण केल्याची घटना सांगलतील जत तालुक्यात घडली होती. मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही घटना समोर आली. हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवासी असून ते कर्नाटकात जात होते. मात्र स्थानिकांना त्यांची भाषा न समजल्याने हा सगळा प्रकार घडला होता. या प्रकरणी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांकडूकारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी लवंगा गावातील 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

    नेमकं काय झालं?

    उत्तर प्रदेशचे चार साधू कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. या दरम्यान त्यांनी मार्गाबद्दल स्थानिकांना विचारणा केली. त्याची भाषा ही न कळल्याने लोकांना त्यांच्यावर संशय आला. मुलं चोरणारी टोळी समजून चौघांनाही गाडीतून ओढून काठीनं, पट्ट्यानं मारहाण करण्यात आली. यावेळी आम्ही साधू असल्याचं वारंवार चौघांकडून सांगितलं जात होतं. पण संतप्त जमावानं त्यांचं काहीही न ऐकून घेता मारहाण सुरुच ठेवली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांकडून तातडीनं कारवाई करून नागरिकाच्या तावडीतून साधूंना सोडवण्यात आलं. यावेळी आम्ही साधू असल्याचं वारंवार चौघांकडून सांगितलं जात होतं. पण संतप्त जमावानं त्यांचं काहीही न ऐकून घेता मारहाण सुरुच ठेवली होती. मारहाणीनंतर साधूंनी तक्रार देण्यास नकार दिला