aaditya thackeray

आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात एनएम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या अडचणीत आले आहे. आदित्य ठाकरे यांनी 16 नोव्हेंबरला लोअर परळ येथील डेलिसाल उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी कोणतीही पुर्वपवरवानगी घेतली नव्हती. हा मुद्दा पुढे करत मुंबई पालिकेच्या एका अधिकाऱ्याने आदित्या ठाकरेंसह ठाकरे गटाचे नेत सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरोधात एनएम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    ‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध एनएम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम १४३, १४९, ३२६ आणि ४४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नेमका प्रकार काय?

    ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह काही नेत्यांनी १६ नोव्हेंबर रोजी लोअर परळ येथील डेलिसल ब्रिजचं उद्घाटन केलं आहे. कोणत्याही परवानगीशिवाय हा पूल प्रवाशांसाठी खुला केला. या पुलाचे काम अद्याप बाकी असताना १६ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे आणि इतर काही नेत्यांनी या पुलाचे उद्घाटन केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.