gautami-patil

गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नृत्यावर आक्षेप घेत मृणाल कुलकर्णी यांनी देखील गौतमी विरोधात साताऱ्यात तक्रार दाखल केली होती. मृणाल कुलकर्णी यांनी याबद्दल दु:ख आणि खंत देखील व्यक्त केली होती. कलावंताने आपली मर्यादा पाळायला हवी. लावणीकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टीकोन फार वेगळा आहे. मात्र जर कोणी या प्रकारचं कृत्य करत असेल तर दुर्दैवाने कलावंताविरोधात तक्रार दाखल करावी लागते, असे मृणाल यांनी म्हटलं होतं.

    आपल्या दिलखेचक अदांनी आणि सौंदर्याने गौतमी पाटीलने (Gautami Patil) तरुणाईला भूरळ घातली आहे. मात्र आता हीच गौतमी पाटील आता अडचणीत आली आहे. कोर्टाने गौतमीवर गुन्हा दाखल (Case Against Gautami Patil) करण्याचे आदेश दिले आहेत. गौतमीबद्दल गेल्या काही महिन्यांपासून खूप चर्चा सुरु आहे. आपल्या डान्समध्ये ती अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप प्रतिभा शेलार यांनी केला आहे. त्यांनी तशी तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. त्यावर आता सातारा कोर्टाने (Satara Court) आदेश दिले आहेत. गौतमीच्या नृत्यावर आक्षेप घेत मृणाल कुलकर्णी यांनी देखील गौतमी विरोधात साताऱ्यात तक्रार दाखल केली होती. मृणाल कुलकर्णी यांनी याबद्दल दु:ख आणि खंत देखील व्यक्त केली होती. कलावंताने आपली मर्यादा पाळायला हवी. लावणीकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टीकोन फार वेगळा आहे. मात्र जर कोणी या प्रकारचं कृत्य करत असेल तर दुर्दैवाने कलावंताविरोधात तक्रार दाखल करावी लागते, असे मृणाल यांनी म्हटलं होतं.

    गौतमीने कार्यक्रमात केलेला अश्लील डान्स पाहून सगळीकडून तिच्यावर टीका होत होती. त्यामुळे गौतमीने स्वत: याबाबत माफी मागितली. मला लावणीची संस्कृती मोडायची नाही. जे झाले त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागते, पुन्हा असे होणार नाही, असं गौतमी म्हणाली होती. माफी मागितल्यानंतर गौतमीने काही वेळ तिने संस्कृती जपली मात्र नंतर पुन्हा एकदा तिच्या कार्य्रमांमध्ये अश्लील हावभाव ती करत आहे, असा आरोप मृणाल यांनी केला.त्यामुळे पुन्हा एकदा याबाबत तक्रार दाखल केली. सध्या गौतमीच्या कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता सातारा कोर्टाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

    दरम्यान गौतमी पाटील राजकारणात येण्याची चर्चा सुरु होती. राजकारणात येऊन ती समाजसेवा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.मात्र तिने या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. मात्र ती एका वेबसीरिजमध्ये पदार्पण करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.