Woman stealing passengers' jewelery at Swargate bus station jailed, read detailed report
Woman stealing passengers' jewelery at Swargate bus station jailed, read detailed report

    पुणे : मार्केट यार्ड परिसरात सोसायटीच्या जवळ पार्क केलेल्या इलेक्ट्रीक कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी शिटखालील ५० हजारांची रोकड चोरून पोबारा केल्याची घटना घडली. भरदुपारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात आनंद जैन (वय ४५, रा. गुलटेकडी) यांनी तक्रार दिली आहे.

    कामानिमित्त ५० हजारांची रोकड आणली

    यानुसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी नातेवाईकांकडून काही कामानिमित्त ५० हजारांची रोकड आणली होती. ती रोकड गाडीच्या शिट खाली ठेवली आणि ते गाडी घेऊन घरी आले. त्यांनी गाडी सोसायटीच्या शेजारील लेनमध्ये पार्क केली आणि घरी जेवण करण्यासाठी गेले. यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या गाडीची ड्रायव्हर शेजारील दरवाजाची काच फोडून ठेवलेली ५० हजारांची रोकड व ५ हजारांचे नुकसान केले आहे. तक्रारदार परत आल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसून आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

    पीएमपी बस प्रवासात ५० हजारांची रोकड पळविली
    शहरात बस प्रवासात चोऱ्या करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. खराडी बायपास ते चंदननगर बस स्टॉप असा पीएमपी प्रवासकरताना प्रवाशाच्या चोर खिशातून चोरट्यांनी ४९ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात ४५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे. गुरूवारी सकाळी पावणे आकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.