
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी परस्पर सहमतीने संबंध ठेवणाऱ्या करुणा शर्मा-मुंडे यांना पुणे पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले. त्यांना अटककरून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे
पुणे : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी परस्पर सहमतीने संबंध ठेवणाऱ्या करुणा शर्मा-मुंडे यांना पुणे पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले. त्यांना अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी, अनैसर्गिक अत्याचार कौटुंबिक छळ यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्या सह आरोपी आहेत. याबाबत 23 वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे.
तक्रारदार पीडित महिलेचा पती व करुणा शर्मा यांनी त्यांना घटस्फोट देण्यासाठी त्रास दिला. तर शर्मा-मुंडे यांनी हॉकिस्टिकचा धाक दाखवत त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच
पतीसोबत घटस्फोट मिळावा यासाठी ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांचा शोध घेतला जात होता. यादरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पतीसोबत घटस्फोट मिळावा यासाठी ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांचा शोध घेतला जात होता. यादरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.