cattle market

लंपी (Lumpy Skin) हा संसर्गजन्य आजार आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सर्वच गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपी दाखवत आज खामगावमध्ये गुरांचा मोठा बाजार (Cattle Market) भरवण्यात आला आहे.

    बुलढाणा : संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातही गुरांना लंपी आजार झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात (‌Buldhana) दोनशेपेक्षा जास्त जनावरांना लंपी स्कीन (Lumpi Skin Disease) आजाराची लागण झाली आहे. या आजारामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन जनावरांचा मृत्यूदेखील झाला आहे. असं असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव सजनपुरी भागात गुरांचा बाजार भरवण्यात आला आहे.

    रोगाला प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागामार्फत युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. लंपी हा संसर्गजन्य आजार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत आज खामगावमध्ये मुंबई – नागपूर महामार्गावरील सजनपुरी परिसरात गुरांचा मोठा बाजार भरवण्यात आला आहे.

    गेल्या चार, पाच वर्षांपासून सतत दुष्काळजन्य परिस्थिती आहे. सातत्याने जाणावणारी पाणीटंचाई, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, शासनाच्या विविध योजना गावपातळीवर न पोहचणे आदी कारणांमुळे जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणारे पाळीव प्राण्यांचे गोठे आता दिवसेंदिवस कमी होत आहे. महागाई आणि चारा टंचाईमुळे काळजावर दगड ठेवून जीवापाड जपलेल्या गाई- गुरे- म्हशींची विक्री करण्याची वेळ आता बुलडाणा जिल्ह्यात पशुपालकांवर आली आहे.