उद्धव ठाकरे यांची सीबीआय चौकशी करा; आमदार नितेश राणे यांची मागणी, राणेंचा गौप्यस्फोट काय?

या सगळ्यांचा राजकीय लव्ह जिहाद झालेला आहे. नवरात्रीच्या काळात गरबा आयोजकांना आम्ही आव्हान केलं. की जे कोणी खेळण्यासाठी आणि दर्शनासाठी लोकं येतील ते हिंदूच असले पाहिजे, असा इशारा देखील नितेश राणेंनी दिला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. 

    मुंबई – आज भाजपा आमदार व नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टिकास्त्र डागले. जे हिंदू द्वेशी आहेत ते मुख्यमंत्री असताना सर्वात जास्त हिंदू सणावर बंदी आणली गेली. आम्हाला शिवा शाप देणारे चायनीज मॉडेल हिंदुत्त्ववादी आहेत. सनातन धर्माचा अपमान झाला तेव्हा हिंदू धर्माची बाजू मांडली गेली नाही. हमाससारखी परिस्थिती काँग्रेस इथे घडवत आहेत. ओवेसीच्या दोन्ही भावांचं थोबाड बंद करण्याची हिम्मत यांची नाही. जो हिंदू समाजाच्या हिताचं बोलत असेल तर यांना मिरच्या झोंबतात, असं राणे म्हणाले. (cbi inquiry probe uddhav thackeray mla nitesh rane demand what is nitesh rane secret explosion)

    तेव्हा मातोश्रीवर बसून कॅमेरा साफ करत होते

    दरम्यान, त्यावेळी संजय राऊतांनी राम जन्माच्या विरोधात लेख लिहत होता. राम जन्मभूमीच्या विरोधात गरळ ओकणारा तू आहे. अशी जहरी टीका नितेश राणेंनी राऊत व ठाकरे गटावर केली.उद्धव ठाकरे तेव्हा मातोश्रीवर बसून कॅमेरा साफ करत होते. राम आंदोलन होत होतं तेव्हा तुम्ही गोधड्या ओली करत होते. या सगळ्यांचा राजकीय लव्ह जिहाद झालेला आहे. नवरात्रीच्या काळात गरबा आयोजकांना आम्ही आव्हान केलं. की जे कोणी खेळण्यासाठी आणि दर्शनासाठी लोकं येतील ते हिंदूच असले पाहिजे, असा इशारा देखील नितेश राणेंनी दिला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली.

    हिंदू समाजावर एवढा द्वेश का…

    काही शेम्बडे लोकं काँग्रेसचे गुणगान गात आहेत, अशी मित्रमंडळाची सभा सगळेच करत होते. आम्ही हिंदूंची बाजू घेतली, तेव्हा अन्य धर्माच्या बदल ताई सल्ले का देत नाही. सगळेच सल्ले हिंदू समाजाला का? हिंदू समाजावर एवढा द्वेश का आहे. मोहरमच्या वेळेस त्यांना सल्ले देताना दिसत नाहीत.

    …त्यांना नारायण राणेंनाही मारायचे होते

    काल माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, उद्धव ठाकरे हे नक्षलींच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंना ठार मारणार होते, यावर नितेश राणे बोलताना म्हणाले की, हे खरं आहे. उद्धव ठाकरेंनी राणे साहेबांना देखील मारण्याचा कट रचला होता. उद्धव ठाकरे हा माणूसच असा आहे. सहानुभूती का दाखवावी? हा प्रशचिन्ह आहे.