
31 डिसेंबर सेलिब्रेशनसाठी लाखो लिटर तळीराम दारु रिचवत असतात, परंतू ह्या वर्षी बनावट दारुचा सुळसुळाट आहे, त्यामुळं बनावट दारुपासून सावधान व्हा, असा सावधनतेचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.
मुंबई- 2022 या वर्षाला निरोप देण्यासाठी काही अवघे तास उरले आहेत. त्यामुळं अनेकांनी 31 डिसेंबर सेलिब्रेशनची जोरदार तयारी आणि नियोजन आखले आहे. मात्र तुम्ही जर 31 डिसेंबर सेलिब्रेशन साजरे करणार असाल, तर थांबा कारण तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. 31 डिसेंबर सेलिब्रेशनसाठी अनेकांनी आऊटिंग, बाहेर फिरायला, प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देण्याचा बेत आखला आहे. हे सेलिब्रेशन करत असताना खाणे-पिणे हे क्रमप्राप्त आलेच. मात्र तुम्ही दारु पित असाल तर सावधान…
बनावट दारुपासून सावधान
31 डिसेंबर सेलिब्रेशनसाठी खवय्ये व तळीरामांसाठी दारु हा जिव्हाळ्याचा तसेच आवडीचा विषय, त्यामुळं 31 डिसेंबर सेलिब्रेशनसाठी लाखो लिटर तळीराम दारु रिचवत असतात, परंतू ह्या वर्षी बनावट दारुचा सुळसुळाट आहे, त्यामुळं बनावट दारुपासून सावधान व्हा, असा सावधनतेचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. कारण ही बनावट दारु पियल्यामुंळ आरोग्यास हानीकारण ठरू शकते, असं पोलिसांनी तसेच आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे.
पोलिसांची करडी नजर
31 डिसेंबर सेलिब्रेशनसाठी अनेकजण रात्री उशिरा बाहेर फिरण्यासाठी जातत, तसेच रात्री उशिरा सेलिब्रेशन करुन मौजमजा करण्याचा कित्येकांचा बेत, नियोजन आहे, मात्र तुम्ही जर रात्री उशिरा दारु पिऊन येणार असला तर, तुमच्यावर मुंबई पोलिसांची करडी नजर राहणार आहे, त्यामुळं बनावट दारुपासून सावधान राहा, अंस मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.