बंडखोर आमदारांच्या घराला केंद्राची सुरक्षा; राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर

एकनाथ शिंदे गटातील १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिले होते, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तोडाफोडी आणि हिंसक घटनेनंतर केंद्र सरकारची (Central Government) शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत १५ आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार आहे.

    नवी दिल्ली : बंडखोर आमदारांविरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक (Shivsainik) रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी घोषणाबाजीसह कार्यालये फोडणे, गाड्या फोडणे, पोस्टर्सला काळे फासण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह बंडखोर (Rebellion MLA) शिवसेना आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या घरांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. दरम्यान, आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे (CRPF) जवान तैनात करण्यात आले असून त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.

    एकनाथ शिंदे गटातील १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिले होते, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तोडाफोडी आणि हिंसक घटनेनंतर केंद्र सरकारची (Central Government) शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत १५ आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार आहे.

    शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले की, आता या कारस्थानामागे भाजप (BJP) असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मुद्दाम अविश्वास दाखवला जात आहे. आता केंद्राची ढवळाढवळ महाराष्ट्राला कळली आहे, असेही सावंत यांनी सांगितले.