
लोकशाहीचे चार स्तंभ सुद्धा हलविण्याचे किंवा त्याला धक्का लावण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरु असल्याचे घणाघाती टिका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे. दरम्यान, देशात दलितांचा धाक राहिला नाही. लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत ते हलविण्याची हिंमत केंद्र सरकार करत आहे. मात्र, या विरोधात बोलण्यासाठी एकही नेता पुढे येत नाही. ज्यांनी बोलायला पाहिजे किंवा ज्यांनी व्यक्त झाले पाहिजे ते मात्र मोदींचे दास झाले आहेत. असा टोला प्रकाश आंबेडकर व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता राऊत यांनी लगावला आहे.
जळगाव : सध्या देशात कुरघोडीचे काम सुरु असून, प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम मोदी सरकार करत असून, लोकशाहीचे चार स्तंभ सुद्धा हलविण्याचे किंवा त्याला धक्का लावण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरु असल्याचे घणाघाती टिका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे. दरम्यान, देशात दलितांचा धाक राहिला नाही. लोकशाहीचे चार आधारस्तंभ आहेत ते हलविण्याची हिंमत केंद्र सरकार करत आहे. मात्र, या विरोधात बोलण्यासाठी एकही नेता पुढे येत नाही. ज्यांनी बोलायला पाहिजे किंवा ज्यांनी व्यक्त झाले पाहिजे ते मात्र मोदींचे दास झाले आहेत. असा टोला प्रकाश आंबेडकर व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान, स्वतःला आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधी समजणारे मोदींचे दास झाले आहेत. नावात राम आहे मात्र कार्यातून ते दास असल्याचे म्हणत प्रत्यक्ष नाव न घेता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे नावात प्रकाश आहे पण ऊर्जा त्यांना आंबेडकरांकडून मिळाली, असे म्हणत नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांच्यावरही मंत्री राऊत यांनी टिकास्त्र सोडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जिल्हा अध्यक्ष प्रवीण सुरवाडे यांच्यातर्फे भुसावळ शहरात प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती होती.
मंत्री नितीन राऊत यांच्या टिकेनंतर आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांच्याकडून याला काय उत्तर येते हे पाहावे लागेल. भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंत्री नितीन राऊत यांनी यावेळी भीम गीतांचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी त्यांनी आपले हे मत मांडताना केंद्र सरकार व रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांच्यावर टिकेचे बाण सोडले.