‘अनेक संस्थांचे खाजगीकरण करून सर्वसामान्यांना भिकेला लावायचे केंद्राकडून काम सुरू’; ठाकरे गटाची टीका

केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) आणि राज्यातील 'ट्रिपल इंजिन' (Triple Engine Government) सरकार बिनकामाचे आहे. आरोग्य, शिक्षण, नोकरी, शेती, उद्योग या सगळ्या बाबतीत त्यांनी जनतेची केवळ फसवणूक केली आहे.

    सांगली : केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) आणि राज्यातील ‘ट्रिपल इंजिन’ (Triple Engine Government) सरकाcर बिनकामाचे आहे. आरोग्य, शिक्षण, नोकरी, शेती, उद्योग या सगळ्या बाबतीत त्यांनी जनतेची केवळ फसवणूक केली आहे. आता जाता-जाता खाजगीकरण आणि कंत्राटीकरण करून देशाचे कंबरडे मोडून सर्वसामान्यांना भिकेला लावायचे काम सुरू केले आहे. केंद्र आणि राज्यातील हे सरकार आता हाकलून द्या, असे आवाहन मुंबईचे माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निरीक्षक राम सावंत (Ram Sawant) यांनी केले.

    सांगलीच्या मारुती चौकात ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर होते. मारुती चौकासह शहरातील विविध चौकांमध्ये झालेल्या होऊ द्या चर्चा कार्यक्रमाला सांगलीकरांनी मोठा प्रतिसाद दिला. राम सावंत म्हणाले, ‘राज्यभर सरकारी दवाखान्यांमध्ये मृत्यूचे तांडव सुरू आहे. कमिशनसाठी मंत्री औषध खरेदी करत नाहीत आणि सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही. इतका कोडगेपणा सुरू आहे. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग आणि निवृत्ती वेतन घेऊनही भाजपला मते दिली. त्यांची नातवंडे, परतवंडे आता बेरोजगार फिरायची सोय त्यांच्याच मतावर निवडून आलेले मोदी सरकार करत आहे’.

    शेतकऱ्यांचा पिक विमा कंपन्या तरी सरकार त्यांचा महाराष्ट्रातील व्यवसाय बंद करायला तयार नाही. हे सगळेच कमिशनसाठी सुरू आहे. बेरोजगारी, महागाई आणि राज्यात अस्तित्वात नसलेले ट्रिपल इंजन सरकार फक्त खुर्च्या उगवत आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नापेक्षा आपल्या पालकमंत्रिपदाची आणि पैशाची चिंता लागली आहे. महामारीतून महाराष्ट्राला बाहेर काढणारे उद्धव ठाकरे घरात बसून होते म्हणणारे मंत्रालयात बसून लोकांचे मृत्यू डोळ्याने बघत आहेत. यावरूनच त्यांची पात्रता महाराष्ट्राला समजते, असेही सावंत म्हणाले.