Union Minister Nitin Gadkari inaugurates three-day National Conference

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) कर्नाटकमधून जीवे खंडणीसाठी मारण्याचा धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्यात आली आहे. (Nitin Gadkari Threat Call) गडकरी यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात (Nagpur News) सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

मुंबई– मागील काही दिवसांपासून राज्यातील (State) राजकीय नेत्यांना (Leaders) जीवे मारण्याच्या धमक्यांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) कर्नाटकमधून खंडणीसाठी जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देण्यात आली आहे. (Nitin Gadkari Threat Call) गडकरी यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात (Nagpur News) सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवून फोन करणाऱ्याचा तपास सुरु केला आहे. या घटनेमुळं राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित नसल्याची टिका विरोधकांनी केली आहे.

या व्यक्तीकडून धमकीचा फोन…

दरम्यान, नितीन गडकरी यांना जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे कॉल आले आहेत. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागपूर पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचे कॉल आल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दोनदा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे कॉल आले. जरी कॉल करणाऱ्या व्यक्तीने तो जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी बोलत असल्याचा दावा केला असला तरी धमकी देणारी व्यक्ती कोण आणि त्याने कुठून कॉल केले याचा तपास व चौकशी पोलीस करताहेत.

राजकीय नेत्यांना धमकीच्या फोनमध्ये वाढ

त्यानंतर आता  मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांना असाच जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. मागील महिन्यात आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. तर अशोक चव्हाण यांनी देखील आपल्यावर पाळत ठेवली जात असून, आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नीवर हल्ला करण्यात आला होता. तसेच संजय राऊतांनी आपणाला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा आरोप केला होता.