
मध्य रेल्वेने या कामाला प्राधान्य देऊन, कालबाह्य (ओव्हरेज्ड) लोको, डिझेल सरप्लस लोको, अ-ऑपरेशनल रेल्वे लाईन्स आणि जुनाट किंवा अपघाती लोको/कोच यासह विविध प्रकारचे भंगार निवडण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
मुंबई – मध्य रेल्वेच्या “झिरो स्क्रॅप” मिशनला गती मिळाली मिळाली आहे. भंगार विक्रीतून १५०.८१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एप्रिल ते ऑगस्ट-२०२३ या कालावधीतील प्रमाणबद्ध विक्री लक्ष्यापेक्षा भंगार विक्रीची ही सर्वाधिक टक्केवारी आहे. प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड विहित वेळेत भंगार साहित्यापासून पूर्णपणे मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने “झिरो-स्क्रॅप” मिशन सुरू केले आहे. मध्य रेल्वेने या कामाला प्राधान्य देऊन, कालबाह्य (ओव्हरेज्ड) लोको, डिझेल सरप्लस लोको, अ-ऑपरेशनल रेल्वे लाईन्स आणि जुनाट किंवा अपघाती लोको/कोच यासह विविध प्रकारचे भंगार निवडण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. (central railway earned one hundred fifty crore rupess from scrap sales zero scrap mission accelerating)
रेल्वे बोर्डाच्या प्रो-रेटा…
या दृढनिश्चयी प्रयत्नाचे प्रभावी परिणाम मिळाले आहेत, मध्य रेल्वेने दि. ३१.८.२०२३ पर्यंत १५०.८१ कोटी रुपयांची भंगार विक्री गाठली आहे. रेल्वे बोर्डाच्या प्रो-रेटा उद्दिष्टाच्या तुलनेत ऑगस्ट २०२३ पर्यंत ३७.१०% ची उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने गाठलेल्या एप्रिल ते ऑगस्ट-२०२३ या कालावधीतील आनुपातिक विक्री लक्ष्यापेक्षा ही सर्वाधिक टक्केवारी वाढ आहे.
खालील विक्रीद्वारे हे साध्य झाले आहे
• ६०८६ मेट्रिक टन रूळ,
• ०९ लोकोमोटिव्ह,
• १६० कोच, आणि
• ६१ वॅगन्स (भुसावळ विभागातील १२ किमी जामनेर-पाचोरा सेक्शन नॅरो गेज लाईनसह)
मिशन झिरो स्क्रॅपसाठी प्रमुख योगदान – एप्रिल ते ऑगस्ट-२०२३ या कालावधीसाठी रु. १५०.८१ कोटी भंगार विक्री महसूल खालीलप्रमाणे आहे.
1. माटुंगा डेपोने रु.२७.१२ कोटींची भंगार विक्री गाठली.
2. मुंबई विभागाने रु. २५.९७ कोटींची भंगार विक्री गाठली
3. भुसावळ विभागाने २२.२५ कोटी रुपयांची भंगार विक्री गाठली.
4. पुणे विभागाने रु.१६.०८ कोटींची भंगार विक्री गाठली.
5. भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेड डेपोने १६.०५ कोटी रुपयांची भंगार विक्री गाठली.
6. सोलापूर विभागाने ११.३६ कोटी रुपयांची भंगार विक्री गाठली आणि
7. नागपूर विभागाने रु.१०.०७ कोटींची भंगार विक्री गाठली.
8. मध्य रेल्वेवरील इतर ठिकाणांनी एकत्रितपणे २१.९१ कोटी रुपयांची भंगार विक्री गाठली आहे.
झिरो स्क्रॅप मिशन अंतर्गत सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त दर्जा मिळवून देण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या वचनबद्धतेवर ठाम राहिली आहे आणि रेल्वे बोर्डाचे २०२३-२४ वर्षासाठी ३०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ओलांडले आहे.