उष्णतेवर करा मात, देऊन मध्य रेल्वेच्या एसी लोकलची साथ! प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मध्य रेल्वेची हटके जाहिरात

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तसेच प्रवाशांना गर्मीपासून वाचविण्यासाठी तसेच मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी वातानुकूल लोकलच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत. “उष्णतेवर करा मात, देऊन मध्य रेल्वेच्या एसी लोकलची साथ! उष्णता आणि आद्रेतवर करा मात...देऊन मध्य रेल्वेच्या एसी लोकची साथ, भाडे झाले निम्मे आता... आनंद घ्या थंडगार आरमशीर आणि स्वस्त प्रवासाचा” अशी जाहिरात मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आली आहे.

    मुंबई : सध्या कडाक्याचा उन्हाळा आहे. सर्वत्र गर्मी, उष्णता यामुळं अंगाची लाही लाही होत आहे. अशावेळी प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी तर दुसरीकडे रेल्वेतील प्रवाशांची गर्दी. विरार ते चर्चगेट किंवा कल्यान ते सीएसएमटी प्रवास करायचा म्हटला तरी लोकलमधील डबे खचाखच भरलेले असतात, त्यातच उष्णतेमुळं अंगाची लाही लाही होतेय. अशामुळं प्रवास करायचा कसा? असा प्रश्न सध्या मुंबईकरांना पडत आहे.

    मात्र आता मध्य रेल्वेनं यावर एक नामी शक्कल लढवत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तसेच प्रवाशांना गर्मीपासून वाचविण्यासाठी तसेच मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी वातानुकूल लोकलच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत. “उष्णतेवर करा मात, देऊन मध्य रेल्वेच्या एसी लोकलची साथ! उष्णता आणि आद्रेतवर करा मात…देऊन मध्य रेल्वेच्या एसी लोकची साथ, भाडे झाले निम्मे आता… आनंद घ्या थंडगार आरमशीर आणि स्वस्त प्रवासाचा” अशी जाहिरात मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आली आहे.

    दरम्यान, मध्य रेल्वेकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी वातानुकूल लोकलच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत. अशी जाहिरात मध्य रेल्वेन सुरु केली असून, यावर वातानुकूल तिकिटाचे दर सुद्धा देण्यात आले आहेत. सीएसएमटी ते ठाणे ३४ किलो मिटरचा प्रवास आहे, यासाठी फक्त ९५ रुपये तिकिट सिंगल प्रवासासाठी आहे, तर सीएसएमटी ते कल्यान १०५ किलो मिटरचा प्रवास आहे, यासाठी फक्त १०५ रुपये तिकिट सिंगल प्रवासासाठी मोजावे लागणार आहेत, त्यामुळं आता भाडे झाले निम्मे आनंद घ्या थंडगार आरमशीर आणि स्वस्त प्रवासाचा अशी जाहिराताचे टिव्ट मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी केले आहे. तसेच अधिकाधिक प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.