‘त्या’ झेडपी कर्मचारी संघटनेवर माझा संशय; बदली प्रक्रियेवरून सीईओ स्वामी संतप्त

राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद, पंचायात समिती कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पण या बदल्या करताना काही कर्मचारी संघटनेनी प्रशासकीय, विनंती, आपसी बदली प्रक्रियावर काही कर्मचारी संघटनेनी संशय शंका व्यक्त केला आहे.

    सोलापूर : राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद, पंचायात समिती कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पण या बदल्या करताना काही कर्मचारी संघटनेनी प्रशासकीय, विनंती, आपसी बदली प्रक्रियावर काही कर्मचारी संघटनेनी संशय शंका व्यक्त केला आहे. त्यामुळे मला त्यांच्याचं कर्मचारी संघटनेच्या कार्यप्रणालीवर संशय शंका आहे, अशी सडेतोड भूमिका सीईओ दिलीप स्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

    जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या शासकीय नियमानुसार झाल्या आहेत. ठाणेदार कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. फक्त कागदोपत्रीचा आधार घेऊन मुख्यालयात कोण ठाणमांडून बसत असेल तर त्यांची यादी पत्रकार बांधवांनी दिली तर नक्की कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सीईओ स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे.

    जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सीईओ स्वामी यांनी कर्मचारी बदली प्रकरणावरून सडेतोड भूमिका जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुरळीतपणे पार पडल्या आहेत. फक्त आरोग्य कर्मचारी संघटनेकडून निवेदनाद्वारे जाब विचारण्यात येत आहे.

    कोणती ही बदली प्रक्रिया रद्द करण्यात आली नाही. प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे बदली प्रक्रियामुळे तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्याचा विचार करण्यात आला आहे. मात्र, सामान्य प्रशासनाकडून सर्व सविस्तर माहिती मागविण्यात आल्याचे सीईओ स्वामींनी स्पष्ट केलं.