students

विद्यापीठात पदवी प्रवेश (Graduate Admission) होऊन महाविद्यालयाचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. इतर राज्यातील विद्यापीठातील (other University in the state admission completed) प्रवेशही पूर्ण झाले. मात्र, इंजिनीअरींगची प्रवेश प्रक्रिया (Engineering Admission) रखडली आहे.

    नागपूर: विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र इंजिनीअरींगची (Engineering Admission) प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. (Engineering CET Result) इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीही सुरू झालेली नाही. सीईटीचा (CET Result) निकाल १५ सप्टेंबरपर्यंत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे. यामुळे अनेक महाविद्यालयांना फटका बसू शकतो.

    विद्यापीठात पदवी प्रवेश (Graduate Admission) होऊन महाविद्यालयाचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. इतर राज्यातील विद्यापीठातील (other University in the state admission completed) प्रवेशही पूर्ण झाले. मात्र, इंजिनीअरींगची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. सीईटीची परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू आहे. परंतु, अद्यापही निकालाची घोषणा झालेली नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार १५ सप्टेंबरपर्यंत हा निकाल लागेल. त्यानंतर १५-२० दिवसानंतर नोंदणी प्रक्रियेला (Registration) सुरूवात होणार आहे. त्यानंतर आक्षेपांची नोंद होईल. त्यानंतरच मेरीट यादी (Merit List) लागेल. ऑक्टोबरच्या पहिल्या टप्प्यात प्रवेशाचा विचार केल्यास नोव्हेंबरअखरेपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. तंत्रशिक्षण विभागातफें इंजीनीअरींग प्रवेश प्रक्रिया केली जाते. मात्र, परीक्ष ही विद्यापीठ प्रशासनातर्फे घेतली जाते. फेब्रुवारी-मार्चमध्ये विद्यापीठाने हिवाळी परीक्षा (Winter Exam) घेतली. त्यामुळे अंतीम टप्प्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ अभ्यासासाठीही पुरेसा वेळ नव्हता. निकाल लांबणार असल्याने याचा थेट परिणाम प्रवेशप्रक्रियेवर (Admission Process) पडेल.