महाबळेश्वर येथे साखळी उपोषणास सुरुवात

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथील आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे महाबळेश्वर तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने आज मंगळवारी शहरात मोर्चा काढून साखळी उपोषणास सुरुवात झाली

    महाबळेश्वर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी येथील आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे महाबळेश्वर तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने आज मंगळवारी शहरात मोर्चा काढून साखळी उपोषणास सुरुवात झाली

    महाबळेश्वर तालुक्यातील बहुसंख्य गावांनी बंद पळाला होता शहरात पर्यटकांना व मंगळवार आठवडे बाजारासाठी दुर्गम भागामधून शहर येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये या उद्धेशाने शहरातील व्यवहार दिवसभर शांततेत सुरु होते सकाळी अकरा वाजता येथील पंचायत समिती पासून मोर्चास प्रारंभ झाला हा मोर्चा एस टी स्थानक मार्गे मुख्य नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे आला तेथे असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास हार घालण्यात आला तदनंतर मुख्य चौकापासून बाजारपेठ मार्गे हा मोर्चा छ शिवाजी महाराज चौक येथे पोचला मोर्चामध्ये भगव्या टोपी परिधान केलेल्या महिला भगिनी त्यामागे असंख्य मराठा बांधव सहभागी झाले होते. ”एक मराठा लाख मराठा” यासह छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छ संभाजी महाराज की जय च्या जयघोष करण्यात येत होता मुख्य छ शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या छ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर मान्यवरांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे स्व अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची माहिती देण्यात आली शासनाने तातडीने समाजाला आरक्षण द्यावे अशी आग्रही भूमिका मान्यवरांची आमच्या भाषणातून मांडली मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील याना पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरु करण्याचा निर्धार देखील यावेळी करण्यात आला प्रथम महाबळेश्वर शहरातील मराठा बांधवानी या उपोषणास सुरुवात केली सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत हे उपोषण सुरु ठेवण्यात येणार असून ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील मराठा बांधव सहभागी होणार आहेत.