दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ; आरोपींकडून ७ गुन्ह्यांची उकल

पुण्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना भिगवण पोलिसांनी शनिवारी (दि. १७) रात्री अटक केली. त्यांच्याकडून दुचाकीसह ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी तब्बल ७ गुन्ह्यांची उकल केली आहे.

  भिगवण : पुण्यासह उस्मानाबाद (Osmanabad District)जिल्ह्यात चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना भिगवण पोलिसांनी (Bhigwan Police) शनिवारी (दि. १७) रात्री अटक केली. (Crime)त्यांच्याकडून दुचाकीसह ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी तब्बल ७ गुन्ह्यांची उकल केली आहे.

  चैतन्य पांडुरंग शेळके ( वय-२०)  आणि किशोर सहदेव पवार (वय २० दोघेही रा. भोत्रा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी  अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री भिगवण  हद्दीत पोलीस गस्त घालत असताना, पोलिसांना दोन इसम संशयास्पदरीत्या अंधारात फिरत  आसल्याचे आढळून आले.

  -दुचाकीसह ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
  पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक लोखंडी धारदार कोयता व लोखंडी गज, एक ज्युपिटर मोटार सायकल मिळून आली. त्यांच्याकडून दुचाकीसह ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

  भिगवण, वारजे, शिरूरमधील गुन्ह्यांची कबुली
  दरम्यान, पोलिसांनी आरोपी चैतन्य   आणि किशोरकडे  अधिक चौकशी केली असता, आरोपींनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ज्युपिटर दुचाकीची,  शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रॅक्टर चालकाला मारहाण करीत  रोख रक्कम व ट्रॅक्टर जबरीने चोरून नेला. परंडा येथून  मोबाईलची चोरी तसेच  भिगवण, बारामती तालुका आणि यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. त्यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस अधिनियम कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  या पथकाची कामगिरी
  ही  कामगिरी भिगवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, विनायक दडस पाटील, पोलीस अंमलदार समीर करे, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, अजित सरडे, होमगार्ड आप्पा सातपुते, लक्ष्मण ढवळे, पोलीस मित्र रवी काळे, सिधु आळंदकर आणि अशोक सुळके यांच्या पथकाने केली आहे.