भास्कर जाधवांना आव्हान देण्यासाठी, उदय सामंतांचे भाऊ किरण सामंतांची राजकीय मैदानात एन्ट्री

भास्कर जाधव हे अलीकडे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची मिमिक्री करत त्यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर नितेश राणे, निलेश राणे, प्रसाद लाड व प्रवीण दरेकर यांनी बोचरी टिका भास्कर जाधव यांच्यावर केली होती. त्यामुळं जाधव यांना आव्हान देण्यासाठी किरण सामंत यांना मैदानात उभे केले जाणार आहे. किरण सामंत यांचा रत्नागिरी बरोबरच पलिकडे असलेल्या गुहागर मतदारसंघातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

    रत्नागिरी : सध्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) व राणे (Rane family) कुंटुबीय व भाजपा (BJP) नेते यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे खूप आक्रमक आहेत. तसेच ते थेट विरोधकांना अंगावर घेतात. त्यामुळं जाधव हे सध्या भाजपा व शिंदे गटाच्या हिटलिस्टवर आहेत. दरम्यान, कोकणात भास्कर जाधव यांना आव्हान देण्यासाठी थेट रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत (Kiran samant) यांची राजकीय मैदानात एन्ट्री होणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे आहेत. यांना शह देण्यासाठी शिंदे गटातील मंत्री उद्य सामंत यांचे बंधु किरण सामंत यांची या मतदारसंघातून तिकिट देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    भास्कर जाधव हे अलीकडे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची मिमिक्री करत त्यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर नितेश राणे, निलेश राणे, प्रसाद लाड व प्रवीण दरेकर यांनी बोचरी टिका भास्कर जाधव यांच्यावर केली होती. त्यामुळं जाधव यांना आव्हान देण्यासाठी किरण सामंत यांना मैदानात उभे केले जाणार आहे. किरण सामंत यांचा रत्नागिरी बरोबरच पलिकडे असलेल्या गुहागर मतदारसंघातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मागील महिन्यात भास्कर जाधव समर्थकांनी थेट किरण सामंत यांची भेट घेऊन एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं गुहागर तालुक्यातील असलेला संपर्क लक्षात घेऊन कदाचित भास्कर जाधव यांचासमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी गुहागर विधानसभा मतदारसंघात किरण उर्फ भैय्या सामंत यांना आगामी निवडणुकीसाठी तिकिट दिले जाण्याची शक्यता आहे.