बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंपुढे ठाकरे गटाकडून सुषमा अंधारेंचं आव्हान?, सुषमाताई म्हणाल्या ‘इलाका तुम्हारा..’

सध्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेत; कारण चार दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती. ‘ज्या गोष्टी मनात बाळगून साध्य करण्यासाठी मी राजकारणात आले, त्या गोष्टी समाजासाठी करण्याची जर मला परवानगी मिळत नसेल, तर कॉम्प्रोमाइजचे राजकारण करणे मला जमत नाही.

  बीड – माझं स्वागत छान केलं. मी सगळ्याच्या ऋणात राहणे पसंत करेन. मराठवाड्यात आचारसंहिता आहे त्यामुळे महाप्रबोधन यात्रा आणता आली नाही. काही अंध भक्त आमच्या वर टीका करत आहेत. पक्ष बेकायदेशीर आहे का? आमदार आणि खासदार या संख्येवर पक्ष ठरत नाही. पक्षाला मिळलेल्या मतदानाच्या टक्केवारी वर पक्ष ठरतो, आम्ही मतांची टक्केवारी सिद्ध केली आहे. सुभाष देसाई, संजय राऊत यांच्यासह आमचे नेते बेकायदेशीर असतील तर यांच्या सह्या त्या चाळीस आमदार यांच्या A B फॉर्म ला सूचक म्हणून आहे. जे निवडणुकीला सामोरे गेलेच नाहीत त्यांची टक्केवारी कुठून येईल.
  माजलगावमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. बैठकीला ठाकरे गटाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत आगामी निवडणुकावर चर्चा करण्यात आली. पक्ष मजबूत करण्याचे अंधारे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

  शिंदे गटावर टीका
  जे होईल ते होईल आम्ही लढणार आहोत… आणि आम्ही जिंकणार आहोत, ही आमची स्टाईल आहे. इलाका तुम्हारा धमाका हमारा, शिंदे गट कॉप्या करून पास झाले आहे. येणाऱ्या काळात सर्वच निवडणुका लढणार आहोत. कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, माझ्या बीड जिल्ह्यात विनायक राऊत येणार आहेत.

  सध्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेत; कारण चार दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती. ‘ज्या गोष्टी मनात बाळगून साध्य करण्यासाठी मी राजकारणात आले, त्या गोष्टी समाजासाठी करण्याची जर मला परवानगी मिळत नसेल, तर कॉम्प्रोमाइजचे राजकारण करणे मला जमत नाही. मला भीष्म पितामहाची भूमिका करणे आवडते. ’ असे म्हणत त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली जात आहे.

  आमदार सुनील शिंदे यांची पंकजा यांना ऑफर
  आमदार सुनील शिंदे हे पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या शाखेचंही उद्घाटन केलं. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटना बांधणीवरही चर्चा केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्षही मोठा आहे. त्यामुळे त्यांनी काय मत व्यक्त केलं, त्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही, असं सुनील शिंदे यांनी स्पष्ट केलं. पंकजा मुंडे या राज्यातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होतोय. आपण सर्वच ते पाहत आहोत. अर्थात ही त्यांची पक्षांतर्गत बाब आहे. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाची नेहमीच आम्हाला कदर असेल. पण त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि त्यांना जर शिवसेनेत यायचं असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. देश हुकूमशाही पद्धतीने चालवला जात आहे. तपास यंत्रणा केंद्राच्या दबावाखाली काम करत आहेत. विरोधकांनाच फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपमध्ये गेल्यावर सर्व पापं धुतली जात आहे. यावरून काय ते कळून येतं, असंरही ते म्हणाले.