Barshi Taluka Cricket Academy, Sahara CreekKingdom win Champions Trophy under-14 cricket tournament

  पुणे : चॅम्प्स स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चॅम्प्स करंडक 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत बार्शी तालुका क्रिकेट अकादमी, सहारा क्रीककिंगडम या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून आगेकूच केली.
  धायरी येथील स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी व सहारा क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत आयुश घोलप (90धावा) याने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर बार्शी तालुका क्रिकेट अकादमी संघाने रन्स क्रिकेट अकादमीचा 9 गडी राखून पराभव केला.
  अन्य लढतीत अथर्व आखाडे(1-7 व नाबाद 58धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एके स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी संघाने ज्युनियर महाराष्ट्र क्रिकेट अकादमी संघाचा 7 गडी राखून पराभव करीत तिसऱ्या विजयाची नोंद केली. वेदांग जागडेच्या (50धावा) अर्धशतकी खेळीसह आरुष फडणीस(3-19) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर सहारा क्रीककींगडम संघाने स्पेशलाइज क्रिकेट क्लिनिक संघाचा 40धावांनी पराभव केला.
  निकाल : साखळी फेरी :
  रन्स क्रिकेट अकादमी : 25 षटकात 9बाद 123धावा (नुरूप बोरकर 24, नैतिक तापडे 23, समर्थ देशपांडे 12, यज्ञेश झालटे 3-18, साई राउत 2-25, युवराज पाटील 2-7) पराभुत वि. बार्शी तालुका क्रिकेट अकादमी: 13.4षटकात 1बाद 127धावा(आयुश घोलप 90(46,13×4,5×6), साई घुगे नाबाद 18, अथर्व अंधारे नाबाद 11); सामनावीर – आयुश घोलप; बार्शी तालुका क्रिकेट अकादमी संघ 9 गडी राखून विजयी;
  ज्युनियर महाराष्ट्र क्रिकेट अकादमी : 21.3षटकात सर्वबाद 97धावा(अथर्व शिंदे 23, मोहंमद 26, रणवीर चव्हाण 12, प्रणय आवळे 3-10, अथर्व आखाडे 1-7) पराभुत वि. एके स्पोर्टस क्रिकेट अकादमी: 20.5षटकात 3बाद 98धावा(अथर्व आखाडे नाबाद 58(49,8×4,2×6), प्रणय आवळे नाबाद 13, मोहंमद मुजावर 12, ओम अगरवाल 1-14); सामनावीर – अथर्व आखाडे; एके स्पोर्टस क्रिकेट अकादमी संघ 7 गडी राखून विजयी;
  सहारा क्रीककींगडम : 25षटकात सर्वबाद 160धावा(वेदांग जागडे 50(43,8×4), राजवीर बनसोडे 34(26,6×4), अर्णव नेमाडे 19, अर्जुन थोरात 3-37, आदर्श चोरघडे 2-22, शर्विल शेवाळे 2-30, अमर कामत 2-34) वि.वि.स्पेशलाइज क्रिकेट क्लिनिक: 25षटकात 7बाद 120धावा(आदर्श चोरघडे नाबाद 26, शर्विल शेवाळे 23, ऋषभ गायकवाड 20, अर्जुन थोरात 12, आरुष फडणीस 3-19); सामनावीर – आदर्श चोरघडे; सहारा क्रीककींगडम संघ 40धावांनी विजयी.