उन्हाळा सुरू होताच वातावरणात पुन्हा बदल; आता विदर्भात गारपिटीची शक्यता

उन्हाळा सुरू होताच वातावरणात पुन्हा बदल घडून अवकाळी पावसासह गारपीटचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, सावधान राहा, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे. मराठवाडा आणि सभोवताली 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत, तर तामिळनाडूपर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे.

    अमरावती : उन्हाळा सुरू होताच वातावरणात पुन्हा बदल घडून अवकाळी पावसासह गारपीटचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, सावधान राहा, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे. मराठवाडा आणि सभोवताली 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत, तर तामिळनाडूपर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे.

    सोबतच मराठवाडा, विदर्भ दक्षिण छत्तीसगड, आंध्रप्रदेशवर खंडित वाऱ्यांची स्थिती आहे. अशातच ऐक नवीन पश्चिमी विक्षोभ 26 फेब्रुवारीला पश्चिम हिमालयाला भिडण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीमुळे विदर्भात 25 ते 29 फेब्रुवारीपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

    29 फेब्रुवारीपर्यंत पावसाचे वातावरण

    25 फेब्रुवारी रोजी संपूर्ण विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पाऊस आणि वारा, गडगडाट आणि विजांची शक्यता आहे. तर 26 व 27 फेब्रुवारी रोजी संपूर्ण विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पाऊस, वारा, गडगडाट आणि विजांची शक्यता आहे. तर संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे 28 व 29 फेब्रुवारी रोजी विदर्भातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.