आज राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; नागपूरसह कोणत्या 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या…

पुढील काही दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाकडून (Meteorological Department ) अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज पूर्व विदर्भात (East Vidarbha) मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागानं दिला आहे.

    नागपूर – सध्या राज्यात (State) पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे. जुलै महिन्यात पावसाने राज्यातील कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार, रायगड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सातारा, विदर्भातील काही जिल्हे, यवतमाळ, मराठवाडा येथे मुसळधार पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाकडून (Meteorological Department ) अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज पूर्व विदर्भात (East Vidarbha) मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागानं दिला आहे. (chance of heavy rain in this part of the state today orange alert for which five districts including nagpur find out)

    कुठे ऑरेंज अलर्ट?

    दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. येतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज (शनिवार, 19 ऑगस्ट) पूर्व विदर्भात सळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार आहे. त्यामुळं आज पूर्व विदर्भात (East Vidarbha) मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागानं दिला आहे.

    ऑगस्ट महिन्यात पावसाची उसंत…

    जुलै महिन्यात जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मात्र उसंत घेतल्याचं चित्र आहे. मात्र आजपासून राज्यातील काही भागात जोरदार पाऊस होईल, असं हवामान विभागाने म्हटलंय. उर्वरित महाराष्ट्रात मात्र फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारणपणे २१.४ दिवसांमध्ये ५६०.८ मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो. मात्र १ ते १७ ऑगस्ट या काळामध्ये कुलाबा येथे केवळ २४.६ तर सांताक्रूझ येथे केवळ ३१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे मुंबईतून पाऊस परत गेला का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

    पावसाअभावी खरिपात 35 ते 40 टक्क्यांपर्यंत घट

    अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील खरिपाची (Kharif) उत्पादन क्षमता सरासरी 35 ते 40 टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. पुढील आठ दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास 35 लाख हेक्टरवरील संपूर्ण खरीप धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपाच्या पिकांची पेरणी केली आहे. बऱ्यापैकी क्षेत्र हे पावसावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या 15 दिवसाहून अधिक काळ झालं राज्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरलेली पीकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.