राज्यातील ‘या’ भागांत 12 ते 14 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

राज्यातील हवामान (Climate Change) पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यातील अनेक भागात आगामी चार पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  जळगाव : राज्यातील हवामान (Climate Change) पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यातील अनेक भागात आगामी चार पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

  जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. मात्र, गुजरात, राजस्थानातील उष्ण वारे व अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आता एकाचवेळी जिल्ह्यात प्रवेश करत असल्याने वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आज ११ ते १४ मे दरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक यांनी वर्तवला आहे.

  शुक्रवारी शहरातील तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र, दिवसभरात उन्ह-सावलीचा खेळ सुरू होता. पुढील सहा दिवस कमाल तापमान ४० ते ४२ अंशांवर राहण्याची शक्यता आहे.

  राज्यात अवकाळीचा जोर वाढणार

  राज्यात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने (IMD) दिला. येत्या 24 तासांत कोकण किनारपट्टीसह, विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

  खान्देशातही वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस

  हवामान विभागाने रविवारी चंद्रपूर जिल्ह्याला गारपीटीसाठी आणि पुणे, लातूर, नांदेड तसेच सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईसह उपनगरात देखील अवकाळी पावसाच्या सरी बरसतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.