
राज्यात आजपासून पुढील काही दिवस राज्यात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असं हवामान विभागाकडून (Meteorological Department) अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई : या वर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. जुलै महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. मात्र त्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. ऑगस्ट महिन्यात राज्यात (State) पावसाने (Rain) विश्रांती घेतली. याचा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. काही ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहेत. तर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मात्र सप्टेबरमध्ये थोडाफार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असताना, आता राज्यात पावसाबाबत हवामान विभागाने एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात आजपासून पुढील काही दिवस राज्यात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असं हवामान विभागाकडून (Meteorological Department) अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. (chance of rain with lightning in these thirteen districts of maharashtra so where has the weather department given an alert)
कोण-कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?
दरम्यान, मुंबईसह (Mumbai) संपूर्ण कोकणातही जोरदार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याच्या प्रणाली अस्तित्वात येऊ शकते. त्यातून कमी दाबाच्या क्षेत्रात होवू शकते, त्यामुळं पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर IMD च्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. बीड, परभणी, सोलापूर, जालना आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या शेतकऱ्याना पावसाची गरज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा, अलर्ट जारी
आज राज्यातील काही भागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, मराठवाडा, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्टातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी दिल्यामुळं खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना (Farmers) सध्या चांगल्या पावसाची गरज आहे. यात हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD) आजपासून राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यासह देशात देखील पावसाची शक्यता
दरम्यान, राज्यासह देशात देखील पावसाची शक्यात भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. लडाखमध्ये काही भागांत हिमवर्षाव तर काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.