संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

कोकण, गोवा या ठिकाणी 3 दिवस मेघगर्जना, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटसह पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात दोन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडकडाट, विदर्भात 7 आणि 8 जून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

    मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ येत्या २४ तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात बदलेल, त्यामुळं केरळात दाखल होणारा मान्सून ( (Mansoon)) थांबला आहे, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र देशासह राज्यात पुढील दोन तीन दिवसात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने (IMD) म्हटलं आहे. तसेच राज्यात सोमवारी रात्री काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबईसह उपनगरात पावसाने (Rain) हजेरी लावली. मुंबई उपनगरातील कुर्ला, बोरिवली, अंधेरीसह अनेक भागात रिमझिम पाऊस झाला. त्यामुळं अचानक आलेल्या पावसामुळं लोकांची तारांबळ उडाली. (State Rain)

    पुढील दोन-तीन दिवसात पावसाची शक्यता

    दरम्यान, देशात मान्सूनला विलंब होत असला तरी कोकण, गोवा या ठिकाणी 3 दिवस मेघगर्जना, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटसह पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात दोन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडकडाट, विदर्भात 7 आणि 8 जून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर पुण्यात कमाल तापमानात वाढ होणार नाही, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

    मान्सून लवकरच…

    मान्सूनच्या आगमनाची वाट सर्वंजण पाहत आहेत. चक्रीवादळामुळं केरळात मान्सून दाखल होण्यास विलंब लागणार आहे. मान्सूनची उत्तर सीमा गेल्या चार दिवसांपासून एकाच ठिकाणी अडकली आहे. अरबी समुद्रात पश्चिमेकडील वाऱ्यासह केरळच्या दिशेने संथ गतीने सरकणारे ढग चक्रीवादळाच्या दिशेने खेचले गेले. रविवारी केरळजवळ दिसलेले ढग आता चक्रीवादळाच्या दिशेने अधिक घनतेने एकत्र येत आहेत आणि केरळच्या दिशेने कमी झाले आहेत. सोमवारी सकाळी आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीपवर चक्रीवादळ निर्माण झाले असून यामुळे मान्सूनच्या आगमनाची शक्यता आणखी मागे पडली आहे. तथापि, केरळ आणि किनारी कर्नाटक प्रदेशात येत्या एक-दोन दिवसांत पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.