सुरेश भट सभागृहात ‘चंदनही चंदन’ कार्यक्रमाचे आयोजन

संत तुकाराम महाराज यांच्या मराठी अभंगांचा हिंदी अनुवाद असलेला हा कार्यक्रम प्रथमच सादर होत आहे. भारतीय संगीतावर आधारित हा कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आहे.

  • नवराष्ट्रचा उपक्रम

नागपूर : नागपूर नवराष्ट्रच्या (Navarashtra Nagpur) वतीने दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सुरेश भट सभागृहात (Suresh Bhatt Sabhagruha) सायंकाळी ६.३० वाजता चंदनही चंदन (Chandan Hi Chandan) ओमकार एंटरटेनमेंट निर्मित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सुहाना मसाले (Suhana Masala) या कार्यक्रमाचे सह प्रायोजक आहेत. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध गायक पंडित राहुल देशपांडे (Famous singer Pandit Rahul Deshpande) व युवा गायिका आर्या आंबेकर (Young singer Aarya Ambekar) आपल्या सुमधुर आवाजात हा कार्यक्रम सादर करतील.

संत तुकाराम महाराज यांच्या मराठी अभंगांचा हिंदी अनुवाद असलेला हा कार्यक्रम प्रथमच सादर होत आहे. भारतीय संगीतावर आधारित हा कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आहे. ज्या प्रमाणे संत कबीर, संत मीराबाई यांच्या हिंदी रचना आज देश विदेशात पोहचल्या तसे संत तुकारामाचे अभंग, त्यांनी दिलेले संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश – विदेशात पोहचविण्याचा निर्धार आहे. कार्यक्रमाचे प्रायोजक संजय घोडावत ग्रुप, लोकमान्य मल्टीपर्पस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., साई श्री हॉस्पिटल, एमआयटी मेअर्स, कॉसमॉस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, भारती विद्यापीठ आदी आहे. कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठीच असून प्रवेश पत्रासाठी ७७०९३५५५५३, ८१४९४३९५९३, ९५५२५५६८३२ वर संपर्क साधावा.

येथे करा कार्यक्रमाचे तिकिट बुकिंग