चांदोली धरण फुल्ल! ४ हजार ५७३ क्युसेक विसर्ग सुरूच

 चांदोलीत पावसाचा जोर कमी झाला असला तरीही धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून ४ हजार ५७३क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरूच आहे. धरणात सध्या ३४.२६ टीएमसी पाणी साठा झाला असून चांदोली धरण फुल्ल झाले आहे.

    शिराळा :  चांदोलीत (Chandoli Rain)पावसाचा जोर कमी झाला असला तरीही धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून ४ हजार ५७३क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरूच आहे. धरणात सध्या ३४.२६ टीएमसी पाणी साठा झाला असून चांदोली धरण (Chandoli Dam Overflow) फुल्ल झाले आहे.

    सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३६७.१७ चौरस किलोमीटर  पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक होत असते. ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे धरण दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरते. गतवर्षी २१ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदाही पावसाचे प्रमाण कमी अधिक असले तरीही आठ दिवस आगोदरच धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.