पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते पंकजांची प्रगती रोखत आहेत, भागवत कराड यांच्या ऑफीसबाहेर हाणामारीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

पंकजा मुंडेंचेच (Pankaja Munde) कार्यकर्ते त्यांची प्रगती थांबवत आहेत, कारण तोडफोड, राडा हि भाजपाची संस्कृती नाही. जर संधी नाही मिळाली तर संघर्ष करुन संधी मिळेल, किंवा उमेदवारी कोणाला द्याची व कोणाला नाही हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठीचा निर्णय असतो. पण उमेदवारी न मिळाल्यामुळं राडा घालणे, तोडफोड केल्याने पंकजा मुंडेंचेच नुकसान होईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

    कोल्हापूर : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे कार्यकर्ते खूपच आक्रमक झाल्याचे पाहयला मिळत आहे. रविवारी दुपारी बीडमध्ये (Beed) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्या गाडीचा ताफा पंकजा मुंडेच्या कार्यकर्त्यांनी अडविला. तर, औरंगाबादमध्ये (Aurangabad) केंद्रीय मंत्री भागवत कराड  (Bhagavar karad) यांच्या ऑफीसबाहेर हाणामारी केली. पंकजा मुंडेंचं नाव राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांसाठी चर्चेत होते. पण त्यांना डावलण्यात आले. त्याआधी जर पक्षाने आपणाला संधी दिली तर आपण संधीचे सोने करुन असं पंकजा मुंडे म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांसाठी होती. पण त्यांचे नाव अचानक डावलल्यामुळं पंकजा मुंडेंचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    दरम्यान, पंकजा मुंडेंचेच (Pankaja Munde) कार्यकर्ते त्यांची प्रगती थांबवत आहेत, कारण तोडफोड, राडा हि भाजपाची संस्कृती नाही. जर संधी नाही मिळाली तर संघर्ष करुन संधी मिळेल, किंवा उमेदवारी कोणाला द्याची व कोणाला नाही हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठीचा निर्णय असतो. पण उमेदवारी न मिळाल्यामुळं राडा घालणे, तोडफोड केल्याने पंकजा मुंडेंचेच नुकसान होईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडेंचा समर्थकांनी दरेकरांचा ताफा अडवला तर भागवत कराड यांच्या क्रांती चौकातील (Kranti Chowk) कार्यालयात राडा घातला. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली

    औरंगाबादमध्ये भागवत कराड यांच्या ऑफीसबाहेर राडा व धळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप देण्यात आला. या घटनेची पोलिसांनाही माहिती असल्याने, पोलिसांनी तात्काळ त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पण, पंकजा मुंडेंवर खरे प्रेम करणारे कार्यकर्ते असतील तर ते अशी कृत्ये करुन पंकजाताईंची प्रगती रोखत आहेत, अशा शब्दात पाटील यांनी भूमिका मांडली. तसेच, पक्ष त्या गोष्टीत इंटरटेन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच घडलेली घटना दुर्दैवी होती असं सुद्धा पाटील यांनी म्हटलं आहे.