चंद्रकांत पाटलांनी डायरेक्ट अमित शहांना पाठवलं पत्र, अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची केली मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब(Anil parab) यांच्याविरोधात सचिन वाझे(Sachin Waze Case) याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयतर्फे सखोल चौकशी(CBI Inquiry) कराावी, अशी प्रदेश भाजपची मागणी असल्याचं चंद्रकांत पाटलांनी लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील आमदार आणि मंत्र्याची ईडीकडून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी(CBI Inquiry OF Ajit Pawar And Anil Parab) करावी, अशी मागणी(Letter To Amit Shah) करणारे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयतर्फे सखोल चौकशी कराावी, अशी प्रदेश भाजपची मागणी असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे.

    भाजपच्या प्रदेश कार्यसमितीने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव केला होता. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण मागणी करत असल्याचा चंद्रकांतदादांनी दावा केला आहे. याआधीही भाजपच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीबद्दल ठराव मांडण्यात आला होता. भाजपच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.