दीड कोटींचं सागवान घेऊन जाणारा ट्रक उलटला

    चंद्रपूर (Chandrapur) : ओडिसा येथून सागवान जातीचा माल घेऊन गुजरातकडे निघालेल्या ट्रकचा गोंडपिपरी येथील तलावाजवळ अपघात झाला. या अपघातात चालकाला किरकोळ इजा झाली.

    ट्रक मधील सागवन माल तस्करीचा असावा अशी शंका सुरवातीला घेतली गेली. मात्र चालकाकडे ट्रक मधील सागवान मालाची कागदपत्रे होती.