आयारामना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला ‘हा’ इशारा, बावनकुळे म्हणाले…

सध्या निवडणुकीच्या तोंडावर जे कोणी आमच्या पक्षात येत आहे, त्यांना आम्ही मोठं करणार नाही, असा इशारा बावनकुळेंनी दिला आहे. बाहेरुन येणाऱ्याला निवडणुकीत तिकिट देऊन आम्ही मोठं करणार नाही, तर मूळ पक्षातील कार्यकर्त्यांनाच आम्ही प्राधान्य देणार असून, त्यांनाच तिकिट किंवा मोठं करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

    कोल्हापूर : भाजपाची 2014 साली सत्ता आल्यापासून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे, म्हणजे अन्य पक्षातील नेते, कार्यकर्ते भाजपात येत आहेत. राज्याप्रमाणे केंद्रात देखील असेच चित्र पाहयाला मिळत आहे. काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर जे भाजप पक्षात पक्षांतर करत आहेत, त्यांच्यासाठी खास इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलताना पुढे म्हणाले की, सध्या पक्षांतर जोरात होत आहे, दरम्यान, सध्या निवडणुकीच्या तोंडावर जे कोणी आमच्या पक्षात येत आहे, त्यांना आम्ही मोठं करणार नाही, असा इशारा बावनकुळेंनी दिला आहे. बाहेरुन येणाऱ्याला निवडणुकीत तिकिट देऊन आम्ही मोठं करणार नाही, तर मूळ पक्षातील कार्यकर्त्यांनाच आम्ही प्राधान्य देणार असून, त्यांनाच तिकिट किंवा मोठं करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.