Bawankule owns Rs 5,000 crore, relatives allege with immense black money

सकाळी ९ वाजता विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर काहीवेळातच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रमुख नेत्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. तसेच भुवया उंचावल्या जात आहेत. व तर्कवितर्क लढविले जात आहेत.

    मुंबई : आज विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार आहे. या जागेसाठी भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांनी एक एक मतांसाठी अपक्षांची मनधरणी करत आहेत. तसेच मतांच्या जुळवाजुळवीसाठी आमदारांना मागील चार दिवसांपासून आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. भाजप व मविआने जोरदार फिल्डिंग (For one one vote MVA and BJP fielding) लावली आहे. यावर आता मतदान प्रक्रिया जवळपास पूर्ण होत येत असताना, आता या निकालावर विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, भाजप आमदार व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule यांनी अचानक उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) भेट घेतली आहे. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

    दरम्यान, सकाळी ९ वाजता विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर काहीवेळातच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रमुख नेत्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. तसेच भुवया उंचावल्या जात आहेत. व तर्कवितर्क लढविले जात आहेत.

    या भेटीनंतर काही वेळाने याठिकाणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे देखील दाखल झाले. यामुळं ही भेट कोणत्या कारणावरुन झाली असावी, यासाठी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. विशेष म्हणजे या तिघांच्या भेटीमागचा नेमका उद्देश अद्याप कळू शकलेला नाही. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजपचे पाचही उमेदवार जिंकणार असा दावा केला आहे. पण या तीन नेत्यांच्या भेटीमागचे कारण समजू शकले नाही.