
राज्याच्या सत्ता संघर्षाचा आणि लोकशाहीला दिशा देणारा निकाल म्हणून आजच्या निकालाकडे राज्यासहीत संपूर्ण देशाचे लक्ष होते. आज यावर सर्व पडदा पडला असून, सुप्रीम कोर्टाने अनेक बारीक निरीक्षणे नोंदवली. यामध्ये राज्यपालांवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढत त्यांच्या कृतीवर सुद्धा आक्षेप घेतला. तरीही कोर्टाने हेही निरीक्षण नोंदवले की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर त्यांना सरकार बनवता आले असते. परंतु, त्यांचा राजीनामा कोर्ट माघारी घेऊ शकत नाही. 16 आमदारांच्या पात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवत. आताच्या सरकारला दिलासा दिला. आता यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत, या सरकारला कायदेशी म्हटले आहे. पाहूया चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमके काय म्हटले आहे.
धाराशीव : राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय स्वागतार्ह असून, त्यातून उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने नवीन सरकार कायदेशीर असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. शिंदे गटाला दिलासा देत १६ आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे हे सरकार मजबूत व स्थिर असल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिव येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
LIVE | 📍धाराशिव | माध्यमांशी संवाद https://t.co/RmiuO2sOOK
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) May 11, 2023
सुप्रीम कोर्टाचे राज्यपालांवर ताशेरे
राज्यपालांवरील सुप्रीम कोर्टाने टीप्पणी करताना त्यांनी केली कृती चुकीची असून, त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. तसेच, त्यांच्यावर ताशेरे ओढत त्यांनी बोलावली प्लोअर टेस्ट चुकीची असल्याचे सांगितले यावर प्रतिक्रिया देताना, बावनकुळे यांनी तो सुप्रीम कोर्ट आणि राज्यपाल यांच्यातील प्रश्न आहे. आमच्यासाठी आमचे सरकारबाबत काय विधान केले हे महत्त्वाचे आहे. याबाबत राज्यपाल आणि कोर्ट पाहून घेतील,
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा कशासाठी?
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी नैतिकता ठेवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, असे म्हटले होते. यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राजीनामा देण्याचे कारण काय हे सरकार कायदेशीर असल्याचे बावनकुळेंनी म्हटले आहे.