‘पवारांनी खंजीर खुपसण्याचं काम केलं, हे आम्हाला…’; चंद्रशेखर बावनकुळे यांची घणाघाती टीका

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक प्रयत्न केले. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे, हे आम्हाला अजित पवार आणि छगन बुजबळ यांनीच सांगितल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

    अहमदनगर : ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक प्रयत्न केले. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे, हे आम्हाला अजित पवार आणि छगन बुजबळ यांनीच सांगितल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.

    आता मुख्यमंत्री कोण असणार? यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे वाटते. तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच विराजमान होतील, असे वाटते. सर्वच कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत. त्यात गैर नाही. आता पुढील निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पार्लमेंट्री बोर्ड घेईल. बोर्ड ठरवेल तोच पुढचा मुख्यमंत्री होईल, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी मांडली.

    बारामती महायुती जिंकणार

    बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे उमेदवार असणार आहेत. त्यांच्याविरोधात अजित पवार यांच्या कुटुंबातील उमेदवार असेल का? असे विचारल्यावर बावनकुळे यांनी सांगितले की, मी एवढेच सांगेल, बारामतीत महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहे.