चंदुकाका सराफ अँड सन्स् प्रा. लि.च्या नाशिक सुवर्ण दालनाचा ६ मे रोजी भव्य शुभारंभ

बारामतीचे मूळ असलेल्या चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. या सुवर्णपेढीने अत्यंत जबरदस्त ऑफर्स जाहीर केल्या असून, ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिककरांना केले आहे.

  नाशिक : प्रभुश्रीराम व सीतामाईंच्यां वास्तव्याने, भगवान त्र्यंबकेश्वरांच्या आशीर्वादाने पूनित झालेल्या गोदावरीच्या पाण्याने सुजलाम-सुफलाम झालेल्या अशा अर्थ, उद्योग, सहकार, लष्करी सामर्थ्य, शैक्षणिक क्षेत्रात सर्वात अग्रेसर असणाऱ्या व उत्तर महाराष्ट्राची राजधानी आणि सुवर्ण त्रिकोणातील महत्वाचे शहर असणाऱ्या नाशिककरांच्या सेवेत बारामतीचे शुध्द सोने हे ब्रीद असलेले व गेली १९५ वर्षे शुध्दता, परंपरा, विश्वास, पारदर्शकता आणि नाविन्यता या पंचसूत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या प्रसिद्ध चंदुकाका सराफ अँड सन्स् प्रा. लि.च्या १८ व्या सुवर्ण दालनाचा नाशिक येथे भव्य शुभारंभ शुक्रवारी (दि.६) सकाळी अकरा वाजता महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या शुभहस्ते होणार आहे.

  यावेळी रवि महाजन आणि क्रेडाई परिवार, म.वि.प्र.स. नाशिकच्या सरचिटणीस निलीमा पवार, खासदार हेमंत गोडसे, मा. आमदार देवयानी फरांदे, मा. आमदार राहुल ढिकले, मा. आमदार सीमा हिरे व कृषी उद्योजक विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.चे चेअरमन किशोरकुमार जिनदत्त शहा, संचालक अतुलकुमार जिनदत्त शहा,  सिध्दार्थ अतुलकुमार शहा, आदित्य अतुलकुमार शहा, सम्यक किशोरकुमार शहा, नेहा शहा, संगीता शहा व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. नाशिक कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे संपन्न होत आहे.

  या निमित्ताने बारामतीचे मूळ असलेल्या चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. या सुवर्ण पेढीने अत्यंत जबरदस्त ऑफर्स जाहीर केल्या असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिककरांना केले आहे. उद्घाटनानिमित्त दर दोन तासांनी अशी एकूण ४५ भव्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये रू. १४,९९९/-च्या पुढील दागिने खरेदीवर व रू. ३००० च्या पुढील गुंतवणुकीवर भेट वस्तू मिळण्याची सुवर्णसंधी आहे.

  यामध्ये ९ टॅब, २२ स्मार्ट वॉच, १२ ब्लू- टूथ स्पीकर अशी बक्षिसे आहेत. याशिवाय मेगा प्राईज म्हणून दोन ॲक्टिव्हा ६ जी मिळणार आहेत. ६ मे २०२२ रोजी दर दोन तासांनी व ७ व ८ मे रोजी दिवसा अखेरीस आकर्षक भेटवस्तू मिळवण्याची संधी उपलब्ध‍ आहे. कृषी आणि उद्योगांचे महत्वाचे केंद्र असलेल्या व समृध्दी महामार्गाने समृध्द होत असलेल्या आधुनिकता, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सहकार, धार्मिक वारसा लाभलेल्या नाशिक शहरात सुरू होणारी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. ची ही अठरावी शाखा आहे.

  बारामतीचे शुद्ध सोने, माफक घडणावळ, चांदीचा शुद्धतेनुसार दर, परंपरा व नाविन्याचा मेळ साधणारी सोने व हिरेजडीत दागिन्यांची आकर्षक डिझाइन्स, लाईटवेट दागिन्यांची भरपूर व्हरायटी अशी विशेष वैशिष्ट्ये असणाऱ्या या पेढीने ग्राहकांनी ठेवलेल्याे विश्वासाला सार्थ ठरवून यशस्वी निरंतर वाटचाल करत आहे. एका दुकानापासून सुरु झालेला हा प्रवास आता दोन राज्ये, ११ शहरं व १८ दिमाखदार सुवर्ण दालनांपर्यंत पोहोचला आहे. नाशिक शाखेमध्ये वेडिंग ज्वेलरीडेस्टीनेशन या लग्नाकरिता परिपूर्ण अशा दागिन्यांचे प्रशस्त स्वतंत्र दालन साकारले आहे.

  समृध्द आणि सुजलाम-सुफलाम नाशिक शहरात पदार्पण करताना आमचा आनंद द्विगुणीत होत असून आता नाशिकच सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी आम्ही येत आहोत. चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स प्रा. लि च्या माध्यमातून नाशिककरांना साजश्रृंगारासाठी आता मिळणार उत्तमोत्तम आणि अभिनव पर्याय. नाशिककरांचे व आमचे अतूट नाते निर्माण होईल, असा विश्वास चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. चे किशोरकुमार शहा व  अतुलकुमार शहा यांनी व्यक्त केला आहे. उद्‌घाटन समारंभ व योजनांचा लाभ समस्त नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन संचालक सिध्दार्थ शहा यांनी केले आहे.