गुणवत्ता व विश्वासार्हतेमुळे ‘चंदुकाका सराफ’ ज्वेलरी क्षेत्रामध्ये उत्तर महाराष्ट्रात आघाडीचे नाव संपादन करेल : छगन भुजबळ

गेली १९५ वर्षे शुध्दता, परंपरा, विश्वास, पारदर्शकता आणि नाविन्यता या पंचसूत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या प्रसिद्ध चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स् प्रा. लि. यांच्या नाशिक सुवर्ण दालनाचा शुभारंभ करताना मला आनंद होत आहे.

    नाशिक : गेली १९५ वर्षे शुध्दता, परंपरा, विश्वास, पारदर्शकता आणि नाविन्यता या पंचसूत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या प्रसिद्ध चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स् प्रा. लि. यांच्या नाशिक सुवर्ण दालनाचा शुभारंभ करताना मला आनंद होत आहे.

    चंदुकाका सराफ अँड सन्स् प्रा. लि. या सुवर्ण पेढीने पिढ्यान् पिढ्यांचा कमावलेला विश्वास आणि गुणवत्ता यामुळे त्यांचा नावलौकिक संपूर्ण राज्यभर झालेला आहे. नाशिकमध्ये अनेक सुवर्णपेढ्या आल्या आहेत. पण चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स् प्रा. लि. त्यांच्या गुणवत्तेमुळे आता उत्तर महाराष्ट्रातील ज्वेलरी क्षेत्रातील आघाडीचे नाव संपादन करेल, असा विश्वास महाराष्‍ट्राचे अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

    चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स् प्रा. लि. यांच्या नाशिक सुवर्ण दालनाचा शुभारंभ कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष रवि महाजन, आमदार सीमा हिरे, गौरव ठक्कर, चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रा. लि.चे चेअरमन किशोरकुमार जिनदत्त शहा, संचालक अतुलकुमार जिनदत्त शहा, आदित्य अतुलकुमार शहा, सम्यक किशोरकुमार शहा, नेहा शहा, संगीता शहा, प्रियांका कुंभोजकर उपस्थित होते.

    यावेळी बोलताना छगन भुजबळ म्‍हणाले की, भारत ही सोन्यासाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सोन्याच्‍या गुंतवणूकीवरील विश्वासामुळेच आजही ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणावर सोने खरेदीकडे असतो. चंदुकाका सराफ यांनी साकारलेले दागिने हे अतिशय कलाकुसरीचे व नाविन्यपूर्ण डिझाईन्‍सचे आहेत. चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स् प्रा. लि. यांनी साकारलेल्या वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशन या लग्नाकरिता परिपूर्ण अशा दागिन्यांचे प्रशस्त स्वतंत्र दालन साकारले आहे. याचेही विशेष कौतुक यावेळी भुजबळ यांनी केले.