संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

हवामान खात्याने पुढील तीन दिवस जिल्ह्यासाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, रविवारपासून ते 27 फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यातील काही भागांत विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

    वाशिम : हवामान खात्याने पुढील तीन दिवस जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यातील काही भागांत विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

    गेल्या वर्षाच्या अखेरीस नोव्हेंबर महिन्यात जिल्हाभरात अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कपाशीसह भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. त्यानंतर मागील आठवड्यात पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. या नैसर्गिक आपत्तीनेही पिकांचे नुकसान झाले.

    आता जिल्ह्यात हरभरा आणि गहू पिकाची काढणी अंतिम टप्यात असताना हवामान खात्याने पुढील तीन दिवस जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह वादळ व पावसाची शक्यता आहे.