
धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना नियमांप्रमाणे सवलत देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक धर्मदाय रुग्णालये या नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.
पुणे : धर्मादाय रुग्णालयांमध्ये (Charitable Hospitals) निर्धन आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना नियमांप्रमाणे सवलत देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक धर्मदाय रुग्णालये या नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर धर्मादायसह आयुक्त यांच्याकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी दिला.
पुण्यासह राज्यात जवळपास साडेचारशे धर्मादाय रुग्णालये आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार धर्मादाय रुग्णालयांनी एकुण होणाऱ्या नफ्यापैकी २ टक्के रक्कम ही गरीब रुग्णांच्या उपचारांसाठी वापरायची आहे. त्यासाठी या रुग्णालयांमध्ये दहा टक्के, खाटा या निर्धन रुग्णांसाठी तातडीच्या सर्व प्रकारच्या रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांनी डिपॉझिट न मागता ताबडतोब दाखल करुन घ्यावे आणि रुग्णाची प्रकृती स्थिर होईपर्यंत उपचार करावेत.
हे दिले निर्देश
- सवलतीस पात्र असलेल्या रुग्णांना उपचार द्यावेत.
- रुग्णाला सार्वजनिक रुग्णालयात नेण्यासाठी वाहतुकीची सुविधा पुरवावी.
- रुग्णांकडून अनामत रक्कम मागू नये.
- रुग्णालयाने खाटा उपलब्ध असूनही पात्र रुग्णास उपचार नाकारल्यास धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा.