छगन भुजबळांनी घेतली ओबीसी आंदोलनकांची भेट, आंदोलकांशी संवाद साधत जाणून घेतल्या मागण्या

छत्रपती संभाजीनगर येथे पोहचल्यावर सर्वप्रथम येथील क्रांती चौकात ओबीसी बांधवांच्या वतीने आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट दिली.

    छगन भुजबळ : मागील तीन दिवसांपासून छत्रपती संभाजी नगरमध्ये क्रांती चौकात ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये त्याचबरोबर ३ विविध मागण्या घेऊन मागील तीन दिवसापासून ५ व्यक्तींनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. उद्या मंत्री मंडळ बैठक शहरामध्ये होणार आहे असे छगन भुजबळ यांनी सांगितले. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. त्या अगोदर पूर्व संध्येला त्यांनी या आंदोलकांची भेट घेतली.

    छगन भुजबळ यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा देखील केली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुळात सरकारने ७ सप्टेंबर २०२३ ला मराठा ओबीसी साठी जी आर काढला आहे. तो ताबडतोब रद्द करण्यात यावा, अशी मागणी उपस्थित आंदोलकांनी मंत्री भुजबळ यांच्या कडे केली आहे. आंदोलकांना भेट दिल्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि तेथील लोकांशी चर्चा केली.

    छगन भुजबळ यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या ट्विट मध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘सध्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पोहचल्यावर सर्वप्रथम येथील क्रांती चौकात ओबीसी बांधवांच्या वतीने आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व त्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. ओबीसी बांधवांच्या हक्कांसाठी मी सातत्याने लढत आलो आहे आणि ओबीसींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी देखील मी सदैव लढत राहीन!यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत, जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. असे त्यांनी ट्विट मध्ये सांगितले.