Chhagan Bhujbal got angry with Sanjay Raut

एकनाथ शिंदे विरुद्ध महाविकास आघडी असा संघर्ष पेटला असतानाच शिवसेनेचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. या सर्व प्रकरणावर चर्चा सुरु असतानाच शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात मतभेद झाले आहेत. छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे(Chhagan Bhujbal got angry with Sanjay Raut).

  मुंबई : एकनाथ शिंदे विरुद्ध महाविकास आघडी असा संघर्ष पेटला असतानाच शिवसेनेचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. या सर्व प्रकरणावर चर्चा सुरु असतानाच शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात मतभेद झाले आहेत. छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे(Chhagan Bhujbal got angry with Sanjay Raut).

  जवळपास 45 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचे समोर आले आहे. शिवसेनेतील ही बंडाळी महाविकास आघाडी सरकारसाठी संकट बनली आहे. एकनाथ शिंदेसह जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असल्याने सरकार चिंताग्रस्त झाले आहे.
  संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे छगन भुजबळ प्रचंड चिडले आहेत.

  एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावावर विचार होईल, शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल असं म्हणत आमदारांनी 24 तासांच्या आज मुंबईत यावं असं आवाहन , संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना केले.

  संजय राऊतांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. छगन भुजबळ आणि संजय राऊत यांच्यात मतभेद झाल्याचे दिसत आहे.

  शिवसेनेची भूमिका मांडत असताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य करण्यापूर्वी एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करायला हवी होती, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.