हाेमपिचवर स्वागत अन‌ विराेधही! छगन भुजबळांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पहाणी

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Minister of Food, Civil Supplies and Consumer Protection Chhagan Bhujbal) हे आपल्या होमपीचवर म्हणजे येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. अवकाळी व गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील कातरणी,  सोमठाण देश , निळखेडे येथे पहाणी करुन पुढे मार्गस्थ होणार होते.

    येवला : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Minister of Food, Civil Supplies and Consumer Protection Chhagan Bhujbal) हे आपल्या होमपीचवर म्हणजे येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. अवकाळी व गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील कातरणी,  सोमठाण देश , निळखेडे येथे पहाणी करुन पुढे मार्गस्थ होणार होते. मात्र यावेळी येवला तालुक्यात भुजबळ यांना काही प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागला तर काही ठिकाणी भुजबळांचे स्वागतही करण्यात आले. ( Chhagan Bhujbal inspected damaged crops due to heavy unseasonal rain and hailstorms )
    भुजबळ मराठा आरक्षणला विरोध करत असल्याच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील विंचूर चौफुली येथे भुजबळांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र ऐनवेळी भुजबळांनी आपला मार्ग बदलत पाहणी दौऱ्याला सुरवात केली विंचूर चौफुलीवर सकल मराठा समाजाच्या वतीने भुजबळ गो बॅक, कोण म्हणतो देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही; अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी आमदार नरेंद्र दराडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे सांगत कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले.
    यावेळी शाहूराजे शिंदे, बाजार समिती संचालक सचिन आहेर, महेश काळे, भागवतराव सोनवणे, झुंजार देशमुख, नितीन लभडे, पांडुरंग शेळके, अक्षय तांदळे, विजय पठाडे, योगेश जहागीरदार, दिनेश पागिरे, गणेश सोमासे, रामदास पवार, रामकृष्ण खोकले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जळगाव नेऊर मार्गे भुजबळ यांचे कातरणी येथे आगमन झाल्यावर त्यांनी नुकसान झालेल्या शेतीची पहाणी केली. यावेळी भुजबळ यांना कोणताही विरोध करण्यात आला नाही; मात्र भुजबळ यांच्याविरोधात गाव बंद ठेवण्यात आले होते. यानंतर भुजबळ यांचा ताफा सोमठानदेश निळखेडे येथे पहाणी करण्यासाठी रवाना झाला सोमठाण देश येथे भुजबळांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. सोमठाण देश येथे भुजबळ यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी ज्यांचे नुकसान झाले ते शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले होते. भुजबळ गो बॅक सातबारा आमच्या बापाचा अशा घोषणा देत भुजबळांचा धिक्कार करण्यात आला. भुजबळ यांच्या दौऱ्यात कोणतीही अघटीत घटना घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.