छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आता शासकीय स्तरावरही साजरी होणार; शिंदे-फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मागील काही दिवसांपासून राज्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन वाद सुरु आहे. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरुन मतमतांतरे तसेच विवाद सुरु आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीबाबत शिंदे-फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय (Decesion) घेतला आहे.

    मुंबई- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) स्थापन झाले आहे, या सरकारला आता राज्यात सहा महिने पूर्ण झाले आहेत, दरम्यान, या सहा महिन्याच्या काळात या सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तसेच विविध विकासकामांचे लोकापर्ण व भूमिपूजन केले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन वाद सुरु आहे. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरुन मतमतांतरे तसेच विवाद सुरु आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीबाबत शिंदे-फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय (Decesion) घेतला आहे.

    दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता १४ मे रोजी सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे. मागील सरकारमध्ये किंवा ‘महाविकास आघाडी’च्या काळात जो निर्णय घेता आला नाही, तो निर्णय आता शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

    शिंदे-फडणवीस सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. तसेच २०२३ या वर्षापासून ही शासकीय व निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे. या वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. ज्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मवीर की, स्वराज्यरक्षक यावरुन वाद सुरु आहे, त्याच छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आता शासकीय कार्यालयात साजरी होणार असल्यामुळं समाधान व्यक्त करण्यात येत आहे.