
मंत्रिमंडळ बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने शहराला छावणीचं स्वरुप आलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : आज शनिवारी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. (Cabinet Meeting) सात वर्षाच्या कालावधीनंतर ही बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे विविध प्रस्ताव सादर करण्यात आले असून, ते सुमारे ५५ हजार कोटींच्या घरात असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राप्त प्रस्तावापैकी काही निवडक प्रस्तावांचा विचार बैठकीत होईल व विभागासाठी सुमारे ४० ते ४५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले जाईल, अशी शक्यता आहे. तसेच या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यामुळे शहराला छावणीचं स्वरुप आलं आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने शहराला छावणीचं स्वरुप आलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.आयपीएस दर्जाचे 6 वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस उपायुक्त दर्जाचे 23 पोलीस अधिकारी, 115 पोलीस निरीक्षक, 296 पीएसआय, 1700 पोलीस, 147 महिला पोलीस, एसआरपीएफच्या 4 तुकड्या, होमगार्ड 500 असे एकूण 3 हजार पोलीस संपूर्ण शहरात तैनात असणार आहेत. त्यामुळं या बैठकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. संशयितांवरही करडी नजर असणार आहे.
मोर्चे व आंदोलने…
मंत्रिमंडळाच्या बैठकीवर एकूण 15 मोर्चे धडकणार आहे. यात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचितचा मोर्चा लक्षवेधी ठरणार आहे. तसेच एकुण मोर्चे – 15 एकुण धरणे/ निदर्शने -06 एकुण निवेदन – 04 मोर्चा रूट – क्रांती चौक ते भडकल गेट धरणे ठिकाण – भडकल गेट