chhatrapati sambhaji nagar on the occasion of mva meeting chhatrapati sambhaji nagar city chowk turned in saffron colour nrvb

उद्या २ एप्रिलला शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात ही सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, शहरभरात होर्डिंग आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. शहरातील सर्व मुख्य चौक भगव्या कपड्यांनी सजवण्यात आले आहेत.

छ. संभाजीनगर : आगामी निवडणुका (Upcoming Elections) लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांनी (Political Parties) कंबर कसली आहे. ते सर्वच आपपल्या परीने कामाला लागले आहेत. दरम्यान राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात (Shinde Fadnavis Government) महाविकास आघाडीतील (MVA) तिन्ही पक्ष आता मैदानात उतरले असून राज्यभरात एकत्रित सभा घेणार आहेत. याच सभेची सुरूवात छत्रपती संभाजीनगर शहरातून (Chhatrapati Sambhaji Nagar) होणार आहे.

उद्या २ एप्रिलला शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात ही सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, शहरभरात होर्डिंग आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. शहरातील सर्व मुख्य चौक भगव्या कपड्यांनी सजवण्यात आले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील जवळपास सर्वच चौक झाले भगवेमय झाले आहेत.

उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी गेल्या आठ दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे.या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सभेकडे जाणारे सर्वच मार्ग भगवेमय झाले असून मुख्य रस्त्यावर सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. तसेच बाबा पेट्रोल पंप, वरद गणेश मंडळ चौक, निराला बाजार, सावरकर चौक, टीव्ही सेंटर चौकसह शहरातील सर्वच महत्वाचे चौक भगव्या कपड्यांनी सजवण्यात आले आहेत. सभेच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर भगवे झेंडे लावण्यात आले आहे. त्यामुळे सध्या शहरात सर्वत्र भगवेमय वातावरण पाहायला मिळत आहे.

राहुल गांधींचाच फोटो नाही…

छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर उद्या महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी तीनही पक्षाकडून करण्यात आली आहे. तर या सभेची महत्वाची जबाबदारी ठाकरे गटाकडे आहे. मात्र ठाकरे गटाकडून सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डिंगवर राहुल गांधी यांचाच फोटो वगळण्यात आला असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. तर ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगवर सोनिया गांधी यांचा फोटो आहे, तसेच शरद पवार यांचा देखील फोटो आहे. परंतु यावेळी राहुल यांचा फोटो वगळण्यात आला आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे देखील फोटो होर्डिंगवर पाहायला मिळत आहेत.

सभेची तयारी अंतिम टप्प्यात…

उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी तिन्ही पक्षाकडून जोरदार तयार केली आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात ही सभा होणार असून, सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तर सभेसाठी खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत. तसेच सभेचं स्टेज देखील उभारण्यात आला आहे. तसेच स्टेजवर तिन्ही पक्षाचे झेंडे पाहायला मिळत आहे. तर सभेच्या परिसरात तिन्ही पक्षाकडून आपापल्या पक्षाचे स्वागाताचे होर्डिंग देखील लावण्यात आले आहेत.