छत्रपती संभाजीराजे शिवबंधन बांधणार? राज्यसभेसाठी शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहा जागांसाठी होणारी निवडणूक चुरशीची बनली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) आणखी एक जागा लढविण्याचाही निर्णय घेतला आहे. तर, संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपण अर्ज दाखल करणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता.

    राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहा जागांसाठी होणारी निवडणूक चुरशीची बनली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) आणखी एक जागा लढविण्याचाही निर्णय घेतला आहे. तर, संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपण अर्ज दाखल करणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान, राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं होतं. यावर आता निर्णय झाला असून छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेना पुरस्कृत राज्यसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र छत्रपती संभाजीराजे पक्षप्रवेश करणार नसल्याचेही बोलले जात आहे.

    दरम्यान छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत आले तरच त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली होती. तर या प्रकरणात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीला संभाजीराजेंना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले होते, मात्र नंतर शनिवारी जी शिवसेनेची भूमिका असेल तीच राष्ट्रवादीची राहील असे सांगितले होते. त्यानंतर महाविकास आघाडीतून शिवसेनेवर संभाजीराजेंसाठी दबाव टाकण्यात आल्याची माहिती आहे. त्यातून छत्रपतींचा राज्यसभेचा मार्ग सकर झाल्याचे दिसते आहे.