सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात केली साजरी

या उपक्रमाचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

    सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाळ अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, पी एम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक नामदेव मठकर सह ग्रामस्थ उपस्थित होते.

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ही असो शिवाजी पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी विभागप्रमुख नागेश ओरसकर महेश पारकर व शिवप्रेमी तरुण नागरिक उपस्थित होते, दुपारच्या सत्रापर्यंत अनेक शिवप्रेमी पुष्पहार घालून अभिवादन केले. विजेत्या क्रिडा तरुणानीही छत्रपतींचा आशीर्वाद घेतला. जय भवानी जय शिवाजी अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यगीतचे गायन करण्यात आले. यावेळी सिंधुदूर्ग किल्ल्यातून प्रज्वलीत केलेली शिवज्योत ओरोस पर्यंत दौड करून आणण्यात आली होती. या उपक्रमाचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

    सिंधुदुर्ग येथील अश्वारूढ शिवाजी महाराजांचा हा पुतळ्याच्या इथे गेली अनेक वर्ष शिवजयंती साजरी केली जाते. यानिमित्त आकर्षक रोषणाई रंगरंगोटी भगवे झेंडे आणि शिवाजी महाराजांच्या पोवाडे व अन्य गीत गायनाने परिसर दणाणून गेला होता. गावागावातही शिवमंडळ प्रेमींनी शाळा महाविद्यालय तसेच ग्रामपंचायत स्तरावर ठिकठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या निमित्त विविध कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले होते. दिवसभराच्या या कार्यक्रम सत्रामध्ये तरुण वर्ग आकर्षित झाला होता.