मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले, आता नांदा सौख्यभरे : भुजबळ

भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांच्यामुळे आमचे सरकार कसे आले हे कळाले नाही. तर आता ते गेले कसे हे देखील कळाले नाही. आता नवीन सरकार आले काय करणार, शिव्याशाप देणार का. एखाद्या नवदाम्पत्याला आपण नांदा सौख्य भरे असे म्हणतो. तसेच तुमचे सरकारही सौख्य भरे आणि राज्याची सेवा करा.

    मुंबई – मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्री झाले हे आम्हाला कळालेच नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी लगवला टोला. ते आज येवला मतदारसंघांतील निफाडमधील सारोळे खुर्द येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना व विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पणावेळी बोलत होते.

    भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांच्यामुळे आमचे सरकार कसे आले हे कळाले नाही. तर आता ते गेले कसे हे देखील कळाले नाही. आता नवीन सरकार आले काय करणार, शिव्याशाप देणार का. एखाद्या नवदाम्पत्याला आपण नांदा सौख्य भरे असे म्हणतो. तसेच तुमचे सरकारही सौख्य भरे आणि राज्याची सेवा करा. सत्ता ही जात येत असते. त्यामुळे सत्ता असो किंवा नसो येवला मतदासंघांच्या विकासात खंड पडणार नाही. सध्या राज्यात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ती अतिशय गुंतागुंतीच्या असून, त्याचा संपूर्ण निकाल हा न्यायालयाच्या हातात आहे. न्यायालय जो निर्णय देईल त्यावर सरकारचे भवितव्य ठरेल. त्याची चिंता करण्याचे कुठलेही काम नाही. आपली विकासाची कामे ही निरंतर सुरू राहतील. येवला मतदासंघांच्या विकासात कुठलाही खंड पडणार नाही.